
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या प्रशासनाला सूचना…
अमळनेर:- अंगणवाडी, पाणी पुरवठा योजनांवर,मराठी शाळावर सौर पॅनल बसवा आणि पाणी सिंचनासाठी मनरेगाची अधिक कामे टाका अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी शिरसाळे येथे कामाची पाहणी करताना दिल्या.
शिरसाळे येथे मनरेगा अंतर्गत अंगणवाडी बांधकाम, जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी, टंचाई अंतर्गत विहीर व आर्डी धरणाची पाहणी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित शिरसाळे येथे आले होते. आर्डी धरणावरून सात ते आठ गावांचा पाणीपुरवठा होतो. मात्र यंदा पाऊस नसल्याने धरण भरले नाही. त्यामुळे या आठही गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. त्यासंदर्भात त्यांनी टंचाई आढावा घेतला व पाण्याच्या स्रोतांची चाचपणी केली. यावेळी अमळनेर पंचायत समितीचे परिविक्षाधीन आय ए एस गटविकास अधिकारी अर्पित चौहान, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) अनिकेत पाटील, अतिरिक्त गटविकास अधिकारी सुशांत पाटील, सरपंच माधुरी सूर्यवंशी, बाबूलाल पवार, ग्रामसेवक नितीन पाटील, पोलीस पाटील प्रदीप चव्हाण,रामचंद्र चौधरी आदी हजर होते.




