
विप्रो पूल व बोरी नदीवरील पुलाच्या दरम्यान घडली घटना…
अमळनेर:- शहरातील तांबेपुरा भागातील तरुण निखिल श्याम पाटील वय २४ याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची घटना विप्रो पूल व बोरी नदीवरील पुलाच्या दरम्यान ५ रोजी पहाटे साडे पाच वाजेच्या सुमारास घडली.
मयत तरुण निखिल हा सुरत येथून सुरत भुसावळ पॅसेंजरने अमळनेर येत होता. पहाटे तीन वाजेच्या सुमारास त्याने त्याच्या आईला फोन करून अमळनेर येत असल्याचे कळवले होते. मात्र त्याला पहाटे झोप लागली. अमळनेर स्टेशनवरून गाडी सुटली आणि त्याला अचानक जाग आल्याने तो धावत्या रेल्वेतून उतरायला लागला आणि त्याचा पाय सटकल्याने चाकाखाली पाय आल्याने डावा पाय कापला गेला त्यामुळे रुळाजवळ पडलेल्या खडीमुळे डोक्याला मार लागून जागीच ठार झाला. रेल्वे पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.




