
अमळनेर:- तालुक्यातील फापोरे बु . येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची मार्च अखेर पर्यंत शंभर टक्के कर्ज वसुली झाली आहे.
फापोरे विकासोने या वर्षी १ कोटी ६९ लाख रुपये कर्ज शेतकऱ्यांना वाटप केले होते त्यानुसार मार्च महिनाअखेर वाटप झालेल्या रकमेचा भरणा बॅकेत जमा झाल्याने १०० टक्के वसूली सोसायटीने केली. यासाठी चेअरमन भालेराव पाटील, व्हाईस चेअरमन खंडेराव पाटील प्रविण पाटील, शरद पाटील , प्रताप पाटील, बाळासाहेब पाटील, प्रदीप पाटील, मुरलीधर पाटील, जितेंद्र पाटील, पंकज पाटील, अशोक पाटील, श्रीमती सुंदरबाई पाटील, श्रीमती भिकूबाई पाटील, नुतन बिऱ्हाडे, सचिव सुनिल पाटील, कर्मचारी आर एम पाटील, योगेश पाटील, सुहास पाटील आदींनी सहकार्य केले .




