
अमळनेर:- तालुक्यातील भोरटेक पाडसे रेल्वे लाईन दरम्यान रेल्वेखाली येवून कापल्याने अज्ञात इसमाचा मृत्यू झाल्याची घटना ६ रोजी उघडकीस आली आहे.
याबाबत भोरटेक स्टेशन मास्तर कुंदन कुमार यांनी दिलेल्या खबरीनुसार ६ रोजी सकाळी ०८:३० वाजेच्या सुमारास भोरटेक ते पाडसे रेल्वे रुळादरम्यान अंदाजे ३० वर्ष वय असलेल्या अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला असून रेल्वेखाली कापला गेल्याने सदर इसमाचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. त्यावरून मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ सचिन निकम हे करीत आहेत.




