
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील ३२ वर्षीय इसमाने राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना ६ रोजी घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मारवड येथील विकास दगडू शिरसाठ (वय ३२) याने राहत्या घरी कोणी नसताना लाकडी सऱ्याला दोरीने गळफास घेतल्याचे दुपारी दोन वाजेच्या सुमारास उघडकीस आले. गावकऱ्यांनी त्यास खाली उतरवून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. माधव शिरसाठ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ सुनील तेली हे करीत आहेत.




