डॉ. योगिता झाली जैतपिर गावाची पहिली एमबीबीएस डॉक्टर…
अमळनेर:-आपली मुलगी डॉक्टर व्हावी असे वडिलांचे स्वप्न असताना जैतपिर गावाची कन्या डॉ. योगिता हिने अपार मेहनत करीत वडिलांच्या निधनानंतरही एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करून वडिलांचे स्वप्न पूर्ण केले असून जैतपिर गावात प्रथम एमबीबीएस डॉक्टर होण्याचा बहुमान तिने मिळविला आहे.
रेल्वेचे माजी मुख्य बुकिंग लिपिक कै. अशोक अजबसिंग शिंदे यांच्या त्या कनिष्ठ कन्या असून त्यांनी बी के एल वालावलकर रुरल मेडिकल कॉलेज, चिपळूण येथून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले आहे.आपल्या वडिलांचे राहिलेले स्वप्न हे पूर्ण करून राजपूत समाजात नाव उज्वल केले म्हणून डॉ. योगिता उर्फ सुरेखा अशोक शिंदे यांचे अमळनेर तालुका राजपूत एकता मंच,अमळनेर तालुका राजपूत समाज पंच मंडळ, राजपूत युवा मंडळ व जैतपिर येथील राजपूत समाज व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे. एमबीबीएस नंतर पीजीचे शिक्षण घेण्याचा मानस डॉ योगिता यांनी व्यक्त केला आहे.