
चिंतामणी गणेश मंदिरापासून उपक्रमाचा करण्यात आला शुभारंभ…
अमळनेर:- शहरातील सर्व मंदिरे स्वच्छ आणि निर्मल राहावेत यासाठी अमळनेर शहरातील शिवालय ग्रुपच्या शिवभक्तांनी “एक दिवस मंदिर स्वच्छतेसाठी” हा उपक्रम हाती घेतला असुन चिंतामणी गणेश मंदिरापासून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

न्यू प्लॉट शिवाजी उद्यान परिसरातील शिवालय मंदिरातील शिवालय ग्रुप धार्मिक कार्यात अग्रेसर असून मंदिर परिसरात विविध धार्मिक उपक्रम हा ग्रुप राबवित असतो.शहरातील सर्व मंदिरे स्वच्छ आणि निर्मळ राहिली पाहिजेत या उद्देशाने या ग्रुपच्या शिव भक्तानी 15 दिवसातुन एक दिवस मंदिर स्वच्छतेसाठी देण्याचे ठरविल्याने या रविवारी जि. प. विश्राम गृहाच्या शेजारील चिंतामणी गणेश मंदिर व परिसराची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली.सदर उपक्रमात किरण मणियार,आबा मराठे, संजय वाणी,महेश राजपूत,प्रसाद जानवे,प्रतीक कोराणी,नमन शर्मा यासह शिवभक्तांनी परिश्रम घेतले. या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले.




