सुरेश पाटील यांच्यातर्फे ३० वर्षांपासून आयोजन…
अमळनेर:- तालुक्यातील धार येथे हिंदू बांधवांकडून दिनांक ७ एप्रिल रोजी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. धार येथील सुरेश सजन पाटील हे १९९४ पासून ते आज पावतो आयोजन करत असून हल्ली मुक्काम पुण्याला असून ही दरवर्षी रमजान महिन्यांमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन करत राहतात. कोरोना काळात सुद्धा सुरेश पाटील यांनी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. धार येथील मुस्लिम समाजातर्फे त्यांचे जंगी स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व शेतकी संघाचे माजी संचालक अलीम मुजावर, धार विकास सोसायटीचे माजी चेअरमन व्ही एन मुजावर, गयास मुजावर, सलादिन मुजावर, धार विकास सोसायटीचे संचालक बाबू पेंटर, हाजी नईम मुजावर, नईम पठाण, हाजी कलीम उद्दीन मुजावर, खलील शेख मुसा, निमन मुजावर, नासिर मुजावर, राजू मुजावर, जाहिद मुजावर, शौकत सय्यद इबा पठाण आदी उपस्थित होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मारवड पोलीस ठाण्याचे पीएसआय विनोद पाटील, फिरोज बागवान, धारचे माजी सरपंच यशवंत बापू पाटील, माजी चेअरमन यशवंत धोंडू पाटील, अरुण भाईदास पाटील व विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक मिलिंद पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलीम मुजावर यांनी केले व आभार व्ही एन मुजावर यांनी मानले.