
अमळनेर:- वर्ष प्रतिपदा निमित्त अमळनेर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन काल दि 8 रोजी सायंकाळी पार पडले.
वर्षप्रतिपदा हा साऱ्या हिंदू समाजाचा वर्षारंभ तसेच सृष्टीच्या प्रारंभाचा संकेत देणारा व संकल्पाचा दिवस,हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून वर्षप्रतिपदेचे संचालन आयोजित करण्यात आले होते.सायंकाळी 5 वाजता प्रताप मिल कामाऊंड मधील संकट मोचन हनुमान मंदिरामोरील मैदानातून सायंकाळी 5 वाजता पथसंचालनास सुरुवात झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त सुभेदार मेजर नागराज एच पाटील व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक प्रदीप रावण कंखरे उपस्थित होते.या संचलनात शहर संघचालक डॉ चंद्रकांत पाटील यांच्यासह सुमारे 200 पेक्षा अधिक स्वयंसेवक सदंड व गणवेशात सहभागी झाले होते. शहरातील विविध मार्गावर अतिशय शिस्तीने पथसंचालन होऊन पुन्हा संकट मोचन हनुमान मंदिरात पोहोचल्यावर समारोप करण्यात आला.
आज दोन ठिकाणी उत्सवाचे आयोजन…
आज दि 9 रोजी सायंकाळी 5.30 वाजता दोन ठिकाणी (दोन उपनगरात) वर्षप्रतिपदा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. सानेनगर भागात सिद्धेश्वर महादेव मंदिर (सोन्याचा महादेव)येथे श्रीमंत प्रताप शेठ उपनगराच्या उत्सवात शिवशंभू विचार मंचचे विभाग संयोजक श्रीकांत पाठक हे प्रमुख वक्ते राहणार असून मराठा मंगल कार्यालयाजवळ भगवा चौक येथे आयोजित संत सखाराम महाराज उपनगराच्या उत्सवात
जळगाव विभाग सहकार्यवाह स्वप्नील चौधरी हे प्रमुख वक्ते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शहर संघचालक डॉ चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.




