
सोन्या-चांदीचे दागिने नेले चोरून, पोलिसांत तक्रार दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील मंगरूळ येथील एका घराचा कडी कोंडा तोडून ७६ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ९ रोजी मध्यरात्री घडल्याचे उघडकीस आले असून अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगरूळ येथील देवेंद्र प्रवीण पाटील हे ९ रोजी रात्री ११ नंतर घराला कुलूप लावून कुटुंबासोबत गच्चीवर झोपले होते. १० रोजी पहाटे गच्ची वरून खाली उतरले असता त्यांना घराचा कडी कोंडा तुटलेला आढळला. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरट्यांनी घरातून २० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन,२१ हजार किंमतीचे कानातील सोन्याचे दागिने,२३ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र,१२ हजार रुपये किंमतीचे चांदीचे दागिने असा एकूण ७६ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला असून अज्ञात चोरट्या विरोधात अमळनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे.कॉ. संजय वना पाटील पुढील तपास करत आहेत.




