शिवाजी हायस्कूलमध्ये बेकायदेशीर संचमान्यता व बोगस भरती दाखविल्याचा आरोप…
अमळनेर:- शहरातील तांबेपुरा भागातील शिवाजी हायस्कूल व ज्यू. कॉलेजच्या २३ शिक्षकांनी शाळेतील बोगस कारभाराबद्दल माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
शाळेत विद्यार्थी संख्येच्या आधारे बोगस संचमान्यतेनुसार पदे दर्शवून एकाच वर्षाच्या वेगवेगळ्या संच मान्यता स्कॅन करून गैरप्रकार केले जात असून शिक्षकांना ही गैरप्रकार करण्यास भाग पाडत असल्याचा आरोप या शिक्षकांनी केला आहे. यात परीक्षा पेपर, निकाल तयार करणे, पोषण आहारात बोगस विद्यार्थी संख्या दर्शवणे असे गैरप्रकार घडत असून संस्था प्रशासनाने २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात बोगस संच मान्यता तयार करून ११ शिक्षकांची पदे असल्याची दाखवून अन्यायी मार्गाने ही प्रक्रिया लादल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
संस्थेत अध्यक्षांची हुकूमशाही सुरू…
शाळेच्या बैठकीत शिक्षकांचे मोबाईल जप्त केले जात असून व्हिडिओ शूटिंग आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याची भीती दाखवून अध्यक्ष शरद शिंदे यांनी शिक्षकांमध्ये दहशत निर्माण करीत असल्याचे तक्रार अर्जात नमूद केले आहे. संस्थाचालक शिंदे याच्याबद्दल आधी ही तक्रारी दाखल असून ह्या नव्या प्रकरणामुळे सर्वांना मॅनेज करण्यात पटाईत असलेला शिंदे पुन्हा चर्चेत आला आहे.
Related Stories
December 22, 2024