
अमळनेर:-आगामी महात्मा फुले जयंती, रमजान ईद,डॉ आंबेडकर जयंती, महावीर जयंती, रामनवमी, हनुमान जयंती, अक्षय्य तृतीया, निवडणूक आणि संत सखाराम महाराज यात्रोत्सव निमित्ताने संयुक्तिक शांतता समिती बैठक १० रोजी नगरपालिकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती.
महापुरुषांच्या जयंत्या, सण उत्सव, लोकसभा निवडणूक आणि संत सखाराम महाराज यात्रा उन्हाळ्यात येत आहे. एक समाजाच्या धर्माच्या मिरवणुकीत दुसऱ्या जाती धर्माच्या लोकांनी पाण्याची व्यवस्था केली तर खऱ्या अर्थाने जातीय सलोखा राखला जाऊन आणि उन्हापासून बचाव करता येईल. शांतता समिती सदस्यांनी किरकोळ बाब त्याच ठिकाणी मिटवावी, तसेच मतदान शांततेत, भयमुक्त, न्यायपूर्ण व्हावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी शांतता समिती बैठकीत केले.
व्यासपीठावर उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, डीवायएसपी सुनील नंदवाळकर, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, पोलीस निरीक्षक विकास देवरे, मुख्याधिकारी तुषार नेरकर उपस्थित होते.
यावेळी डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांनी लोकसभा निवडणुकीत सायबर वॉच आहे. सायबर कायदा सक्षमतेने लागू केला आहे. शांतता समितीने जबाबदारी स्वीकारून घटना घडामोडी तात्काळ प्रशासनाला कळवाव्यात, असे आवाहन केले. मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी सर्व जयंती सण उत्सवात पाण्याचे नियोजन सुरळीत करून पाइपलाइन दुरुस्त करून मिरवणुकीचे मार्ग योग्य केले जातील असे सांगितले. यावेळी डॉ अनिल शिंदे, ऍड शकील काझी, मनोज पाटील, अनंत निकम, प्रविण पाटील, प्रा अशोक पवार, आरिफ तेली, उमेश धनराळे, नूर खान, प्रमोदिनी पाटील, माधुरी पाटील यांनी गटारी, पिण्याच्या पाण्याचे नियोजन, सोशल मीडिया नियंत्रण, वाहतुक कोंडी, पोलीस मित्र याबाबत समस्या मांडल्या. प्रास्ताविक पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार संजय पाटील यांनी मानले. बैठकीसाठी नायब तहसीलदार प्रशांत धमके, सिद्धांत शिसोदे, गणेश पाटील, अमोल पाटील, जितेंद्र निकुंभे, फयाज शेख यांनी सहकार्य केले.
बैठकीस सुभाष चौधरी सचिन पाटील, मुख्तार खाटीक, प्रवीण पाठक, पंकज चौधरी, अनिल महाजन, संजय पाटील, प्रताप शिंपी, इम्रान खाटीक, सलीम टोपी, शब्बीर शेख,नरेंद्र संदानशीव, बाळा संदानशीव, भारती शिंदे, अलका गोसावी, प्रा शिला पाटील, रियाज मौलाना, रज्जाक शेख, पन्नालाल मावळे, चंद्रकांत कंखरे, बाळा पवार, श्याम पाटील यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी सर्व मंडळ व शांतता समिती सदस्य हजर होते.




