अमळनेर:- येथील श्री मंगळग्रह मंदिरात दरवर्षीप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त १० एप्रिल रोजी विशेष लघुरुद्र महापूजा करण्यात आली.
मंदिरात स्वामी समर्थ महाराजांची अलौकिक प्रतिमा स्थापन केलेल्या स्थळी रांगोळ्यांसह विशेष आकर्षक सजावट करून हा उत्सव साजरा झाला. या महापूजेचे मानकरी तासखेडा येथील जिजाबराव दिलमर पाटील हे सपत्नीक होते. त्यांच्या शुभ हस्ते गणपती पूजन, पुण्याह वाचन होऊन स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांवर लघुरुद्र महापूजा करण्यात आली. पुरोहित सारंग पाठक, व्यंकटेश कडवे, साहिल जोशी, मिलिंद उपासनी, ऋषिकेश कुलकर्णी, शुभम वैष्णव, जयेंद्र वैद्य, तुषार दीक्षित, गणेश जोशी, मंदार कुलकर्णी यांनी पौरोहित्य केले. या महापूजेनंतर स्वामींची विशेष महाआरती होऊन महापूजेची सांगता झाली. त्यानंतर मंदिरात पाटील दाम्पत्याच्या हस्ते सायंकाळची श्री मंगळग्रह देवतेची महाआरती करण्यात आली.
यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम यांच्यासह मंदिराचे सेवेकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.