
कळमसरे येथील घटना, पोलिसांत तक्रार दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील कळमसरे येथे नवऱ्या बायकोच्या वादात मेहुण्याने भाग घेत स्वतःच्या पाहुण्याला बदडल्याची घटना घडली आहे.
कळमसरे येथील गणेश देवाजी भील याचा ६ रोजी पत्नीशी किरकोळ वाद झाला. त्याबद्दल त्यांच्या पत्नीने माहेरी सांगितले होते. रात्री ११ वाजता त्याचे शालक राजू धोंडू भील, गणेश धोंडू भील (दोन्ही रा. काळखेडा ता.जि. धुळे), विजय दामू भील, विकास सुभाष भील व अमोल अरुण निकम (रा. बहादरपुर) हे गणेश देवाजी. भील यांच्या घरी आले. माझ्या बहिणीला का मारले असे म्हणत त्यांनी फिर्यादिला मारहाण करण्यास सुरुवात केली. फायटरने डोक्याला मारल्याने डोके फुटून रक्त निघू लागल्याने फिर्यादीचे वडील व भाऊ हे सोडवण्यास आले असता त्यांना देखील वरील लोकांनी मारहाण केली. गावातील लोकांनी मध्यस्थी करत त्यांची सोडवणूक करून फिर्यादीला खाजगी दाखवण्यात दाखल केले. रुग्णालयातून सुटका झाल्यानंतर गणेश देवाजी भील यांच्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ सुनील तेली हे करीत आहेत.




