
हजारो मुस्लिम बांधवांनी केली नमाज अदा…
अमळनेर:- देशात शांतता आणि बंधुभाव नांदावा, अशी प्रार्थना करत काल ईद उल फितरची नमाज इदगाह मैदानावर अदा करण्यात आली.यावेळी हजारो मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली.
परवा संध्याकाळी ईदचा चांद दिसल्यानंतर काल सकाळी ८ वाजता ईदला सुरुवात झाली. गांधलीपुरा येथील ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी मौलाना नौशाद आलम यांच्या मागे नमाज अदा केली. नमाज अदा केल्यानंतर सर्वांनी एकमेकांना मिठी मारून शुभेच्छा दिल्या, ईदगाह मैदानात मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, डीवायएसपी सुनील नंदवाळकर, पीआय विकास देवरे, ऍड ललिता पाटील, डॉ.अनिल शिंदे,संदीप घोरपडे आदी उपस्थित होते.नमाज अदा केल्यानंतर सर्वांनी स्मशानात जाऊन आपापल्या पूर्वजांसाठी प्रार्थना केली.सर्व परिसरात लहान मुले एकमेकांना शुभेच्छा देताना दिसली, संपूर्ण शहरात आनंदाचे वातावरण व हिंदू-मुस्लिम ऐक्य दिसून आले. सर्व बांधवांनी शिरखुरमाचा आस्वाद घेतला.
धार येथे ईद उत्साहात साजरी…
तालुक्यातील धार येथे ईद उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी एपीआय शितलकुमार नाईक, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष शांताराम शामराव पाटील, माजी सरपंच गणेश धोंडू पाटील, शशिकांत पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी व गावातील हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. एपीआय शितलकुमार नाईक यांच्यासह सर्व मान्यवरांचा मुस्लिम समाजातर्फे करण्यात आला. यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अलीम मुजावर, व्ही एन मुजावर, मुशीर मुजावर, यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. मंत्री अनिल भाईदास पाटील यांनीही ईदच्या शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन अलीम मुजावर यांनी केले व आभार व्ही.एन. मुजावर यांनी मानले.




