युवा नेतृत्वाच्या अकाली निधनाने शहरात पसरली शोककळा…
अमळनेर:- शहरातील पटवारी कॉलनी भागातील रहिवाशी सामाजिक कार्यकर्ते सचिन मधुकर खंडारे (वय-४५) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात लिपिक म्हणून ते कार्यरत होते. १० रोजी सायंकाळी अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबई येथे उपचारासाठी नेले जात असतांना ११ रोजी सकाळी ५ वाजता त्यांचे निधन झाले. मितभाषी,सर्वांच्या सुख दुःखात नेहमी अग्रेसर असलेल्या सचिन खंडारे यांना मानणारा मोठा वर्ग होता.११ रोजी सायंकाळी ५ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.