
शहरातून निघाली मोटारसायकल रॅली, सामाजिक उपक्रमास उत्तम प्रतिसाद…
अमळनेर:- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आंबेडकर चौकात पूर्णाकृती पुतळ्याजवळ सकाळी साडे आठ वाजता सामूहिक बुद्ध वंदना म्हणण्यात आली. यावर्षी डॉ बाबासाहेब आंबेडकर परिषदेतर्फे ‛एक वही एक पेन’ जमा करण्याचे सामाजिक अभियान राबविण्यात आले.

यावेळी मंत्री अनिल पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, डीवायएसपी सुनील नंदवाळकर, पोलीस निरीक्षक विकास देवरे, मुख्याधिकारी तुषार नेरकर तसेच नरेंद्र संदानशिव, ज्ञानेश्वर संदानशिव, सोमचंद संदानशिव, संतोष बिराडे, विजय संदानशिव, युवराज चव्हाण, डॉ. योगेश नेतकर, प्रा विजय वाघमारे काँग्रेसचे मनोज पाटील, अविनाश संदानशिव, प्रवीण पाठक, बाळासाहेब संदानशिव उपस्थित होते. तसेच “एक वही एक पेन” हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर शहरात राबविला गेला. यात उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी सुमारे १३३ स्कूल बॅग गरीब मुलांसाठी यावेळी दिले. त्यामुळे या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हे अभियान तारक ठरणार आहे. यशस्वीतेसाठी प्रा कृष्णा संदानशिव, राहुल संदानशिव यांनी मदत केली.
तत्पूर्वी सकाळी साडेदहा वाजता मोटार सायकल रॅली आंबेडकर चौक, दगडी दरवाजा, माळीवाडा, झामी चौक, महाराणा प्रताप चौक, बाजार समिती मार्गे संपूर्ण शहरात काढण्यात आली.




