तिघांविरुद्ध दारूबंदी कलमान्वये गुन्ह्याची नोंद…
अमळनेर:- पोलिसांनी दोन गावांत गावठी दारूच्या हातभट्टीवर धाडी टाकत सुमारे दोन लाख १५ हजार रुपयांचे रसायन व गावठी दारू नष्ट करून हातभट्ट्या उध्वस्त केल्याची कारवाई केली आहे. मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस निरीक्षक विकास देवरे, हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे, प्रशांत पाटील,सागर साळुंखे यांनी जानवे येथे पोलिसांना जानवे येथे भिल्ल वस्तीत नाना बुधा पारधी (वय ६०) हा गावठी दारू विकताना आढळून आला. त्याच्या जवळील चार प्लास्टिक ड्रम मध्ये असलेली ८ हजार रुपये किमतीची ८० लिटर दारू नष्ट केली. लागलीच त्यांना जानवे जंगलात सात तलावाच्या काठावर मोठ्या प्रमाणात दारू भट्टया सुरू असल्याची माहिती मिळताच त्याठिकाणी धाड टाकली असता तेथील आरोपी पळून गेला मात्र तेथे १०० लिटर मापाचे ३० ड्रम असे ३ हजार लिटर कच्चे पक्के रसायन असा १ लाख ५६ हजार रुपयांचा माल जागेवर नष्ट करून दारू गाळण्याचे साहित्य जाळून टाकत भट्टया उध्वस्त केल्या.
पोलीस निरीक्षक किसन पाटील यांच्या आदेशाने संदीप पाटील, सुनील जाधव, नम्रता जरे, राहुल पाटील यांनी म्हसले धरणगाव रस्त्यावर तसेच म्हसले धरणगाव रस्त्यावर उज्वलाबाई वसंत गायकवाड (वय ५२ रा श्यामखेडा ता धरणगाव) ही गावठी दारूची हातभट्टी चालवत असल्याचे समजताच पोलिसांनी तेथील ३० हजार रुपये किमतीचे ६०० लिटर कच्चे रसायन, १५ हजार रुपयांचे १५० लिटर पक्के रसायन व ६ हजार रुपयांची गावठी दारू नष्ट केली. पोलिसांनी नाना पारधी, उज्वला गायकवाड व अज्ञात अशा तीन लोकांविरुद्ध दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.