
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथे विषारी पिठाचे गोळे बकऱ्याना खाऊ घातल्याने एका बकरीचा मृत्यू झाला असून चार बकऱ्यांवर उपचार सुरू आहेत.
मारवड येथील अनिल सीताराम वडर यांच्या १२ बकऱ्या शेडमध्ये बांधल्या होत्या. दिनांक १५ रोजी सकाळी अनिल शेडवर गेले असता एक बकरी मृत अवस्थेत आढळून आली. तसेच इतर चार बकऱ्या तडफडताना दिसल्या. त्यांनी पशुवैद्यकीय दवाखान्यात बकऱ्याना नेल्याने चार बकऱ्यावर उपचार सुरू आहेत. सदर शेडमध्ये पिठाचे गोळे आढळून आल्याने अज्ञात इसमाने विषारी औषध टाकून बकऱ्या मारण्याचा प्रयत्न केल्याचा संशय अनिल वडार यांनी व्यक्त केला असून मारवड पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. पुढील तपास हेकॉ मुकेश साळुंखे हे करीत आहेत.





