
अमळनेर:- शहरातील अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाच्या, सानेगुरुजी विद्या मंदिर, नुतन माध्यमिक विद्यालय आणि, कन्या हायस्कुल च्या शिक्षकांसाठी स्री पुरुष समानता ( जेंडर इक्वालिटी) याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

सामाजिक कार्यकर्त्या दर्शना पवार, प्रा.संदिप गिरासे, यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. यावेळी सामाजिक व नैसर्गिक लिंगभेद याविषयी प्रा गिरासे यांनी मारदर्शन केले. ते म्हणाले की, पुरुषाने स्वयंपाक घरात प्रवेश केल्याशिवाय पुरुषाला जबाबदारीच कळणार नाही,रडणे म्हणजे संवेदनशीलतेचा आविष्कार तसेच बाळ सांभाळण्याची जबाबदारी स्री पुरुष दोघांची असते. तर दर्शना ताई पवार यांनी बोलताना सांगितले की, स्री पुरुषाने एकमेकांना मदत केली तरच संसाराची वेल फुलते. स्री आणि पुरुष हे पितृसत्ताक व्यवस्थेचे दोन्ही बळी आहेत.स्रीयांनी पराक्रमाची उदाहरणे देताना झाशीच्या राणीसह अहिल्याबाई होळकर यांचीच उदाहरणे दिली पाहिजेत. धार्मिक आणि धर्मांध असणे वेगवेगळे असून, निसर्गाने स्री आणि पुरुष यांच्यात विविधता दिली आहे. मात्र त्यात आपण विषमता निर्माण केल्याचे पवार यांनी सांगितले. दरम्यान कार्यशाळेत शिक्षकांना गटकार्य देण्यात आले त्यात शिक्षकांना अध्ययन अध्यापनात उद्भवणारे विविध प्रश्न देण्यात आले. त्यावर पवार आणि प्रा गिरासे यांनी अनमोल मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे,माजी चेअरमन गुणवतराव पाटील, संचालक ऍड अशोक बाविस्कर, किरण पाटील, मुख्याध्यापक संजीव पाटील, श्रीमती अनिता बोरसे, सुनील पाटील यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. यावेळी संदीप घोरपडे यांनी देखील मनोगत व्यक्त केले तर प्रास्ताविक श्रीमती अनिता बोरसे यांनी तर सुत्रसंचालन जे.एस. पाटील यांनी केले.




