आज प्रांतांना निवेदन देण्यासह करणार काळ्या फिती लावुन कामकाज…
अमळनेर:- येथील पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांच्यावर कार्यालयात झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी अमळनेर तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना एकवटल्या असून सर्व शिक्षकांना जाहीर आवाहन करण्यात आले आहे.
यात म्हटले आहे की, आज दि.18 रोजी दुपारी ठीक 12:45 वाजता पंचायत समिती अमळनेर येथे घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी सर्वानी उपस्थित राहावे. त्यानंतर प्रांताधिकारी व पोलीस निरीक्षक अमळनेर यांना शिक्षक संघटनांकडून निवेदन देण्यात येणार आहे. तसेच आज तालुक्यातील सर्व शिक्षकांनी काळ्या फिती लावून कामकाज करावे आणि आज निषेध करण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन अमळनेर तालुका प्राथमिक व माध्यमिक सर्व शिक्षक संघटना यांनी केले आहे.