अमळनेर:- येथील श्री मंगळग्रह मंदिरात श्रीरामनवमी निमित्त दरवर्षीप्रमाणे प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मदिवस अतिशय भक्तिमय आणि चैतन्यमयी वातावरणात साजरा झाला.
याप्रसंगी मंदिरात प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्रतिमेची आरास करण्यात आली. तसेच प्रभू श्रीरामचंद्रांचा पाळणा विविध फुलांनी आकर्षक पद्धतीने सजविण्यात आला होता.
शहरातील लकी-अनुष्का ॲडव्हर्टायझिंग एजन्सीचे संचालक मंगेश महिंद हे सपत्नीक महापूजेचे मानकरी होते. त्यांच्या शुभ हस्ते गणपती पूजन, वरुणदेवता पूजन झाले. प्रभू श्रीरामांच्या मूर्तीवर मंत्रोचारासह विविध मंत्रोचारात अभिषेक होऊन मूर्ती पाळण्यात ठेवण्यात आली. त्यानंतर पाळण्यातील मूर्तीचे पूजन होऊन दुपारी बारा वाजता प्रभू श्रीरामचंद्रांचा पाळणा म्हटला गेला. यावेळी प्रभू श्रीराम नामाचा जयघोष करीत विविध स्तुतीपर गीते गायिली गेली. त्यानंतर गणपती व श्रीरामांची महाआरती होऊन भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला. मंगळग्रह मंदिराचे पुरोहित जयेंद्र वैद्य, अतुल दीक्षित, गणेश जोशी, मंदार कुलकर्णी, अक्षय जोशी यांनी पौरोहित्य केले. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर यांच्यासह मंगल सेवेकरी प्रकाश मेखा, पुषंद ढाके व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.