अमळनेर – साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयातील शिक्षक अरुण शिवाजी पाटील व शिक्षकेतर कर्मचारी नंदकिशोर सोपान निकम हे नियत वयोमानानुसार निवृत्त झाले. त्यांचा निवृत्ती समारंभ विद्यार्थ्यांचा समवेत दिमाखात पार पडला.
सेवापूर्ती निमित्त विद्यार्थ्यांना जिलेबीचे वाटप करण्यात आले, संस्थेकडून सन्मानपत्र शाल व बुके देऊन गौरवण्यात आले. संस्थेच्या चारही शाळांकडून सेवापुर्ती निमित्त यथोचित सत्कार आला.
सेवापूर्ती सोहळ्याचे अध्यक्षस्थानी अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून रणाईचे येथील महानुभाव पंथाचे मठाधिपती मोठेबाबा बिडगर बाबा, संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, संचालक गुणवंतराव पाटील, अमृतराव पाटील, ॲड.अशोक बाविस्कर, भास्करराव बोरसे, किरण पाटील, मुख्याध्यापक सुनील पाटील, मुख्याध्यापिका अनिता बोरसे, मुख्याध्यापक संजीव पाटील, संस्थेचे शिक्षक प्रतिनिधी विलास चौधरी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थी मनोगतात यशमीत खैरनार शिक्षिक सौ.विद्या पाटील व जे.एस.पाटील, मुख्याध्यापक सुनील पाटील, अनिता बोरसे, संजीव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच ॲड.यज्ञेश्वर पाटील, अनिल शिसोदे,माजी मुख्याध्यापक सतीश देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.
अरुण पाटील सर व नंदकिशोर निकम यांनी समर्पण भावनेने केलेल्या सेवेबद्दल मान्यवरांनी गौरवोद्गार काढले. अरुण पाटील सरांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, सर्व संस्थेतील कर्मचाऱ्यांनी मला मोठ्या मनाने स्वीकारले व योग्य प्रसंगी माझ्या कार्याची प्रशंशा केली त्याबद्दल मला कार्य प्रणव राहण्यासाठी ऊर्जा मिळाली. विद्यार्थी घडवण्याचे पवित्र कार्य करण्याचे समाधान मिळाले. यावेळी रणाईचे येथील महानुभाव पंथाचे मठाधिपती मोठेबाबा महंत बिडगर बाबा यांचे आशीर्वाद झाले. त्यांनी त्यांच्या स्वहस्ते अरुण पाटील सर व नंदकिशोर निकम यांचा सेवापुर्ती निमित्त सत्कार केला. सूत्रसंचालन मनीष उघडे तर आभार डी.ए.धनगर यांनी मानले.