चोपडाई कोंढावळ येथे निवडणुककामी तैनात पथकाची कारवाई…
अमळनेर : चोपडा धुळे रस्त्यावर चोपडाई कोंढावळ येथे निवडणूक कामासाठी लावलेल्या पथकाने एकाकडून सुमारे ६६ हजार रुपयांचा गुटखा तंबाखू जप्त करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
२१ रोजी सकाळी १० वाजून ५० मिनिटांनी शिरपूर तालुक्यातील बोराडी येथील अमोल अशोक पवार हा चार चाकी (क्रमांक एमएच १४ एयु ५५६२) ने अमळनेर कडे येत असताना निवडणुकीसाठी नाकाबंदी करणाऱ्या एस एस टी पथकातील पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ,पोलीस निरीक्षक अक्षदा इंगळे, हेकॉ अरुण बागुल , सुनील पाटील, उदय बोरसे, कॅमेरामन भावलाल पाटील, कृषी पर्यवेक्षक योगेश खैरनार यांनी वाहन अडवून त्याची तपासणी केली असता त्याच्या वाहनात ४७ हजार ९१६ रुपयांची २४२ विमल गुटख्याची पाकीटे , १८ हजार ३९२ रुपयांची ८३६ पाकीट तंबाखू असा एकूण ६६ हजार ३०८ रुपयांचा माल आढळून आला. घटनास्थळी डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांनी भेट दिली. पोलिसांनी गुटखा, तंबाखू व दोन लाख रुपये किमतीची कार जप्त करून अमोल पवार याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे करीत आहेत.