मंत्री अनिल पाटील महायुतीच्या बैठकीत आवाहन, स्मिता वाघांना विजयी करण्याचा निर्धार..
अमळनेर:- तालुक्याचे नेतृत्व दिल्लीला पाठविण्याची मोठी संधी आपल्याला भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या माध्यमातून मिळाली असल्याने स्मिताताईंच्या पाठीशी ठामपणे उभे रहा आणि आपला हक्काचा खासदार दिल्लीच्या तख्तावर बसवा असे विनम्र आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी महायुतीच्या अमळनेर येथील बैठकीत केले.
गलवाडे रस्त्यावरील नर्मदा रीसॉर्ट येथे ही बैठक आयोजित करण्यात आली होती याठिकाणी महायुतीच्या वतीने शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले होते या बैठकीस मोठा प्रतिसाद मिळाला.बैठकीस महायुतीच्या जळगाव लोकसभेच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. सुरवातीला प्रास्तविक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांनी केले.अध्यक्षीय मनोगतात पुढे बोलताना मंत्री पाटील म्हणाले की, आजची बैठक विविध स्तरातील आपल्या लोकांनी एकत्र यावे म्हणून आहे म्हणून घेतली आहे,कुणाला आमंत्रण मिळाले नसेल तर त्यांची माफी मागतो,नेतृत्व तयार होणे एवढे सोपे नाही,आणि तयार झाले तर टिकविणे कठीण, नेत्रुत्व तयार होण्यासाठी असंख्य कार्यकर्त्यांची मेहनत असते,या मातीत अनेक नेते तयार होतात पण या मातीशी इमान कोण राखते याला महत्व आहे. भाजपाची लोकसभेची उमेदवारी मिळणे सोपे नाही,नशिबाने स्मिताताईंना ती मिळाली आहे. आज उदय वाघ असते तर अजून चित्र वेगळे राहिले असते,पण दुर्देवाने ते नसले तरी हजारो उदय वाघ येथे स्मिताताई साठी तयार असतील त्यांची कमी आम्ही भासू देणार नाही.महायुतीला 23 पक्षाची साथ मिळाली आहे, वरिष्ठ बैठकित आम्ही सर्वानी ताकदीने मत मांडले की स्मिताताईंनाच उमेदवारी द्यावी, पक्षाने दिली आता राजकीय जवाबदारी आपली सर्वांची आहे,दिल्लीत गेल्यावर आपला खासदार असला आणि आपण तिथे गेलो तर तेव्हा आपली छाती फुलल्या शिवाय राहत नाही, पुढच्या पिढ्या तुम्हाला विचारतील की या अमळनेर साठी तुम्ही काय केले?म्हणून ही तालुक्याला संधी असून विकासाला कलाटणी देण्याची ही वेळ आली आहे,मी मंत्री झालो त्यामुळे झालेला बदल तुम्ही डोळ्यांनी बघत आहेत,शेवटी आपल्या तालुक्याचा विकास महत्वाचा असून ते नाही केले तर आपल्या सारखा करंटा कुणीच नाही,दिल्ली च्या राजकारनात आपले नेतृत्व जाणार आहे, अमळनेर की झलक सबसे अलग हे दाखवून द्यायचे आहे,मी शहराची ब्लु प्रिंट तयार करून काम करतोय,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सिंचन व्यवस्था, रस्ता, उद्योग याकडे लक्ष देतोय, पाडळसरे धरण ला आधी सुप्रमा नंतर सी डब्लू सीची मान्यता देखील मिळवली असूननआता 23 एप्रिलला इन्व्हेस्टर क्लिअरस ची मान्यता मिळणार आहे.नंतर पीआयबी बोर्ड समोर प्रस्ताव सादर होईल आणि मग केंद्रीय निधीचा मार्ग मोकळा होईल. 2025 पर्यंत धरणात पाणी अडणारच हा माझा शब्द आहे. त्यानंतर कदाचित धरण चे तळ पाहायला तुम्हाला मिळणार नाही.येत्या 30 जूनच्या आत शेतकरीना शेतात पाणी देण्यासाठी विशेष योजना सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच बरेच जण येतील आणि डब्या चगवतील कुणाचेही ऐकू नका फक्त तालुक्याचा विचार करा,पुढच्या 50 पिढ्या आपल्याला सुरक्षित करायच्या आहेत,एकमेकांचे पाय ओढायचे नाही,आपलं नेतृत्व दिल्लीला जातंय त्यासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहायचे आहे. मधल्या काळात जातीच विष पेरलं गेलं,आता हेच दाखवून द्या या तालुक्यात जात नाही तर या मातीतील व्यक्ती च महत्वाचा आहे असे त्यांनी आवर्जून सांगितले.
सदर बैठकीत महायुती च्या उमेदवार स्मिता वाघ तसेच जि प सदस्या जयश्री पाटील, ओमप्रकाश मुंदडा,डॉ अविनाश जोशी,सौ वसुंधरा लांडगे,विक्रांत पाटील,यशवन्त बैसाणे,डॉ अक्षय कुलकर्णी, महेश देशमुख,रोटरी क्लब अध्यक्ष प्रतीक जैन,डी ए धनगर,लालचंद सैनांनी,किरण सनेर, रवींद्र पाटील,अजय केले, बहीरम सर,जगन्नाथ बडगुजर आदींनी मनोगत व्यक्त करून स्मिताताई वाघ यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी मंचावर डॉ अपर्णा मुठे,ऍड व्ही आर पाटील,अर्बन बँकेचे चेअरमन मोहन सातपुते, मार्केट सभापती अशोक आधार पाटील,खा शी मंडळाचे संचालक योगेश मुंदडा,सेनेचे तालुकाप्रमुख प्रथमेश पवार,शहर प्रमुख संजय पाटील,नितीन पाटील,सत्तार तेली, सरजू गोकलानी,लालचंद सैनांनी,भाजपा चे जिल्हा सरचिटणीस भिकेश पाटील,ऍड यज्ञेश्वर पाटील,यशपाल बैसाणे, रामदास निकुंभ, बापू हिंदुजा, भाजप शहराध्यक्ष विजय राजपुत यासह असंख्य महिला व पुरुष उपस्थित होते.सूत्रसंचालन शरद सोनवणे तर आभार नीरज अग्रवाल यांनी मानले.
उदय बापु गेल्यावर या तालुक्यानेच मला सांभाळले- स्मिता वाघ
स्वर्गीय उदय बापू वाघ गेल्यानंतर या तालुक्यानेच मला सांभाळले असून संपूर्ण तालुका माझे कुटुंब आहे,हा माझा तालुका असल्याने येथे हक्काने एकत्र बोलविले आहे,तुम्ही जो विश्वास दाखवताय त्याला तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांनी देत सर्वांना भावनिक आवाहन केले.