
दुचाकीस्वार जबर जखमी, पोलीसात तक्रार दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील झाडी गलवाडे रस्त्यावर भरधाव चारचाकीने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना १८ रोजी घडली आहे.
शहरातील ढेकु रोड भागात राहणारे अभिमन्यू आत्माराम बागुल हे दिनांक १८ रोजी त्यांच्या गावी झाडी येथे कामानिमित्त गेले होते. दुपारी तीन वाजेच्या सुमारास ते आपल्या दुचाकीने अमळनेर परत येत असताना झाडी ते गलवाडे दरम्यान समोरून येणाऱ्या इको गाडी (क्रमांक एमएच ३९ एजे ३१७०) चालकाने गाडी राँग साइडने टाकत भरधाव वेगाने येवून दुचाकीला धडक दिली. दुचाकीस्वार अभिमन्यू पाटील हे फेकले गेल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. सदर गाडी चालक कोणतीही मदत न करता पळून गेला. यावेळी ग्रामस्थांनी धाव घेत अभिमन्यू पाटील यांना खाजगी दवाखान्यात दाखल केले. मारवड पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार सदर वाहनचालकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ सचिन निकम हे करीत आहेत.




