अमळनेर:- तालुक्यातील शिरूड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत चौथीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना २० रोजी निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी मुलाच्या वाढ दिवसानिमित्त विद्यार्थ्यांना पेन व शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
शिरूड येथील जिप प्राथमिक शाळेत ह्या वर्षी चौथीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी दि.२० रोजी करण्यात आले होते.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य विजय पाटील यांच्या मुलाचा वाढदिवसानिमित्त त्यांनी एमटीएस परीक्षेस बसलेल्या २५ विद्यार्थ्यांना पेन व इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रविण बोरसे,सदस्य विजय पाटील, चंद्रकांत पाटील,राजश्री पाटील, रूपाली पाटील,शाळेचे
मुख्याध्यापक चंपालाल शिंदे, उपशिक्षक अशोक पाटील, छोटूलाल सुर्यवंशी, चंद्रकांत पाटील, विनोद पाटील, संगिता पाटील आदी उपस्थिती होती.
Related Stories
December 22, 2024