
सकाळपासून सर्व मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी…
अमळनेर:- शहरात अंबर्शी टेकडीवर, डुबकी हनुमान मंदिर , भद्रा मॉल, बाजार समिती, पैलाड, विजय मारुती मंदिरावर हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी महाप्रसाद, भंडारा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
चोपडा रोडवरील अंबर्षी टेकडीवर सकाळी साडे पाच वाजता विजय बाविस्कर यांनी उभारलेल्या २२ फुटी हनुमानाची पूजा करून संजय बाविस्कर व सुनील भामरे यांच्याहस्ते सपत्नीक सामूहिक आरती करण्यात आली. यावेळी ६१ किलो लाडूचा महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तर महावीर आईस्क्रीम यांच्याकडून ५१ फूट उंच झेंडा बसविण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते राजुसिंग परदेशी यांनी सहकार्य केले. यावेळी प्रकाश पाटील, भैरवी पलांडे,संजय बाविस्कर, जितेंद्र सोनवणे,शुभम परदेशी, आशिष चौधरी, नरेश कांबळे उपस्थित होते.
तसेच विजय मारुती मंदिर, बाजार समिती, पैलाड, तांबेपुरा येथील जागृत हनुमान मंदिर, डुबकीचा मारुती या ठिकाणी देखील भक्तांनी सकाळ पासून दर्शनाला गर्दी केली होती. यावेळी माजी खासदार ए टी पाटील,डॉ अनिल शिंदे, उपसभापती सुरेश पाटील, बजरंग अग्रवाल,नीरज अग्रवाल, प्रकाश मुंदडा,योगेश मुंदडा, प्रकाश वाणी,वृषभ पारख, योगेश येवले, जी एम पवार, अभिजित भांडारकर, प्रीतपाल सिंग बग्गा, विनोद अग्रवाल यांच्यासह मोठ्या प्रमाणावर मान्यवर व भक्तगण हजर होते.




