
तालुक्यात सात ठिकाणी राबविण्यात येणार जनजागृतीपर उपक्रम…
अमळनेर:- तालुक्यात सात ठिकाणी आठवडे बाजार भरत असून बाजाराच्या दिवशी त्या त्या ठिकाणी मतदार सुविधा कक्ष स्थापन करून मतदान जनजागृती करण्यात येत असून मतदानाबाबत येणाऱ्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे. बाजारातील सुविधा केंद्रांमुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीबाबत अधिकच जनजागृती झाली असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महादेव खेडकर यांनी दिली.
तालुक्यात अमळनेर (सोमवार ), मारवड (शनिवार), कळमसरे (बुधवार),पातोंडा (सोमवार), मांडळ (बुधवार), जळोद व अमळगाव येथे रविवारी आठवडे बाजार भरतो. बाजाराच्या दिवशी त्या ठिकाणी मतदार सुविधा केंद्र उभारणे सुरू आहे. मतदान जागृती, मतदार क्रमांक, यादी भाग क्रमांक, मतदानाचे ठिकाण तपशील,वोटर हेल्पलाईन ऍप, मतदानासाठी आवश्यक असणारे आवश्यक १२ पुरावे आदी बाबीसाठी मतदारांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. या सुविधा केंद्राचा मतदार लाभ घेत आहेत. या ठिकाणी सेल्फी पॉईंट देखील ठेवण्यात येत असल्याने मतदार आनंदाने सेल्फी फोटो घेत असल्याने अधिक जागृती होत आहे. त्या त्या ठिकाणच्या बीएलओ, क्षेत्रीय अधिकारी, नियंत्रण अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.




