
एकाचा पाय फ्रॅक्चर होवून बसला मुका मार, पोलिसांत गुन्ह्याची नोंद…
अमळनेर:- शहरातील राणे झेरॉक्स जवळ भरधाव वेगाने दुचाकी चालवून समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीला धडक दिल्याने एकाचा पाय फ्रॅक्चर होवून मुका मार लागला आहे.

दिनांक १८ रोजी गोपाळ वसंत पाटील (वय ४८ रा. कलाली) हे आपल्या दुचाकीने शहरातील भागवत रोडकडे जात असताना राणे झेरॉक्स जवळ समोरून भरधाव येणाऱ्या दुचाकी (क्रमांक जीजे ०५ एचके १८१८) स्वाराने जोरदार धडक दिल्याने दोघे रस्त्यावर पडले. सदर दुचाकीस्वार गाडी उचलून पळून गेला. मात्र गोपाळ पाटील यांच्या उजव्या पायाला गुडघ्यापासून खाली फ्रॅक्चर, उजवा खांदा व बरगड्यांना मुका मार लागल्याने तेथे असलेल्या इसमांनी अँब्युलन्स बोलवून गोपाल पाटील यांना खाजगी दवाखान्यात दाखल केले. गोपाल पाटील यांनी दवाखान्यात दिलेल्या जबाबावरून सदर अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध अमळनेर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ अशोक साळुंखे करीत आहेत.





