तालुक्यातील चोपडाई येथील चौघांवर अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल…
अमळनेर:- घराच्या बाजूला लघवी का करतोस ? याचा जाब विचारायला गेलेल्या मायलेकास चौघांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना तालुक्यातील चोपडाई येथे १६ रोजी सायंकाळी साडे सहा वाजता घडली.
विशाल भागवत मोरे ( वय २३) रा.चोपडाई ता.अमळनेर याने अमळनेर पोलीसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,१६ एप्रिल रोजी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास घरासमोर असलेल्या शाळेच्या आवारात गोकुळ रामा पाटील हा लघवी करीत असताना त्याला याबाबत बोललो असता तुला जे करायचे असेल ते कर असे बोलू लागला. सदरील बाब त्याने आई वत्सलाबाई मोरे यांना सांगितल्यावर त्याच्या भाऊ संजय रामा पाटील यांच्याकडे जाऊन हकीकत सांगितली असता त्यावेळेस गोकुळ पाटील शिवीगाळ करू लागला व त्याचा मुलगा राकेश पाटील याने लाकडी दांडा उचलून मारहाण करण्यास सुरुवात केली. तर गोकुळ पाटील, संजय पाटील व वाल्मिक संजय पाटील यांनी त्याच्या वत्सलाबाई मोरेला शिवीगाळ करून जमिनीवर पाडून मारहाण केली. याबाबत अमळनेर पोलीसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल कैलाश शिंदे करीत आहेत.