अमळनेर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल…
अमळनेर:- दारू पिणाऱ्या पतीला घरी बोलवायला आलेल्या महिलेचा चौघांनी विनयभंग करून मारहाण केल्याची घटना तालुक्यातील गडखांब येथे १८ रोजी सायंकाळी पाच वाजता घडली.
गडखांब येथील महिलेचे पती मधुकर भिल याच्या घराबाहेर दारू पित बसलेले होते म्हणून त्याला बोलवायला गेली.तेव्हा अधिकार मधुकर भिल, रामेश्वर अधिकार भिल यांनी महिलेला शिवीगाळ करत जमिनीवर पाडले आणि पोटावर लाथा बुक्क्यांनी मारहाण करून विनयभंग केला. महिला त्यांच्या तावडीतून सुटून घरी आल्यावर पुन्हा अधिकार, रामेश्वर आणि सुनीता आधार भिल व उषाबाई अधिकार भिल हे चौघे आले आणि महिलेचे केस ओढून जमिनीवर पाडले आणि पुन्हा मारहाण केली. त्यात महिलेचे मंगळसूत्र तुटून नुकसान झाले. महिलेची दिराणी भांडण आवरायला आली तर तिलाही त्यांनी मारहाण केली. अमळनेर पोलीस स्टेशनला चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल विजय भोई करीत आहेत.