एक गंभीर, मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद…
अमळनेर:- तालुक्यातील डांगरी येथे एकाने तिघांवर चाकू हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना २५ रोजी रात्री नऊ ते साडे नऊ दरम्यान घडली.
तालुक्यातील डांगरी येथील प्रकाश उत्तमराव शिसोदे व राजेंद्र भीमराव शिसोदे हे त्यांच्या अंगणात खाट टाकून रात्री गप्पा मारत असताना गल्लीतील नाना रामभाऊ शिसोदे हा दोन तीन वेळा त्यांच्याजवळून चक्कर मारून गेला. रात्री नऊ ते साडे नऊ दरम्यान नाना पुन्हा परत आला आणि त्याने राजेंद्र शिसोदे यांच्या मागाहून येऊन त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि अचानक हातातील चाकूने राजेंद्र याच्या पोटावर हातावर चाकूने वार करू लागला. त्याला आवरण्यासाठी प्रकाश शिसोदे पुढे गेले असता नानाने त्यांच्याही पाठीवर वार केला. तसेच प्रकाश यांचा मुलगा सारंग शिसोदे यांच्याही पोटावर वार करून जखमी केले. तुम्हाला आज जिवंत ठेवत नाही म्हणत पळून गेला. तिघे जण जखमी झाल्याने तेथे जमलेले अशोक संतोष चोतमल, प्रशांत नीळकंठ चोतमल, शशिकांत लोटन चोतमल व इतरांनी त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सारंग आणि राजेंद्र गंभीर जखमी झाल्याने त्यांना नर्मदा मेडिकल फाउंडेशनमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले तर प्रकाश शिसोदे यांच्यावर ग्रामीण रुग्णालयातच उपचार सुरू आहेत. प्रकाश शिसोदे यांच्या जबाबावरून मारवड पोलीस स्टेशनला आरोपी नाना शिसोदे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक, सुनील आगोणे,सुनील तेली, धनंजय देसले यांनी २६ रोजी पहाटे साडेचार वाजता डांगरी येथे जाऊन आरोपी नाना याला अटक केली आहे. आरोपीला अमळनेर येथील न्यायालयात हजर केले असता न्या. स्वाती जोंधळे यांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.