अज्ञात चोरट्याविरुद्ध अमळनेर पोलिसांत गुन्ह्याची नोंद…
अमळनेर:- शहरातील नातेवाईकांच्या लग्नासाठी आलेला महिलेचा लॅपटॉप गाडीचा काचा फोडून चोरून नेल्याची घटना २८ एप्रिल रोजी घडली असून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी काजल रविंद्र पवार (रा.पनवेल) ह्या एका खाजगी कंपणीत नोकरीला असून त्यांना कंपनीने कामासाठी २५ हजार रुपये किंमतीचा एचपी कंपनीचा लॅपटॉप दिलेला होता.दि.२८ एप्रिल रोजी नातेवाईकांचे लग्न बन्सीलाल पॅलेस ला असल्याने लॅपटॉप सोबत आणून तो नातेवाईकांच्या गाडीत ठेवला होता. लग्न आटोपल्यावर लॅपटॉप घेण्यासाठी गाडी जवळ पाहिले असता कोणीतरी अज्ञात व्यक्तीने गाडीच्या क्लिनर बाजूची काचा फोडून लॅपटॉप चोरून नेल्याचे दिसून आले असून अज्ञात चोरट्याविरुद्ध अमळनेर पोलीसात भादवी कलम ३७९, ४२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.