
अध्यक्षपदी गोकुळ पारख तर सेक्रेटरीपदी महावीर सिंघवी…
अमळनेर:- सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या जैन सोशल ग्रुपचा पदग्रहण सोहळा २८ रोजी उत्साहात संपन्न होऊन अध्यक्षपदी गोकुळ पारख तर सेक्रेटरीपदी महावीर सिंघवी व त्यांच्या नूतन टीमचा शपथविधी झाला.

कार्यक्रमाची सुरुवात नवकार मंत्र आणि गणेश वंदनाने झाली. त्यानंतर फेडेरेशन सूत्र व दीप प्रज्वलन झाले. पदग्रहण सोहळ्याचे अध्यक्ष हरीश चोरडिया (धुळे) यांनी मनोगत व्यक्त करताना “आपले दृष्टिकोन लक्षात ठेवावे व त्या अनुषंगाने आपले कार्य करत रहावे”, असे मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात जैन सोशल ग्रुपचे महाराष्ट्र रिजनचे जॉईंट सेक्रेटरी सचिन भाई शाह (मालेगाव) व संभाजी नगर मालेगाव झोनचे कॉर्डिंनेटर दिलीप कुचेरिया (धुळे) तसेच जैन सोशल ग्रुप धुळे चे सभासद यांची उपस्थिती लाभली.
अमळनेरचे नूतन अध्यक्ष उमेश उर्फ गोकुळ पारख व सेक्रेटरी महावीर सिंघवी यांची शपथविधी सचिनभाई शाह यांच्याकडून संपन्न झाली.बोर्ड ऑफ डायरेक्टर चे सर्व पदाधिकारी यांनी दिलीप कुचेरीया यांच्याकडून शपथ ग्रहण करून पदभार स्वीकारला. नवनिर्वाचित अध्यक्ष गोकुळ पारख यांनी मनोगत व्यक्त करताना आगामी वर्षात मानस केलेले सामाजिक कार्य पूर्ण करण्याची ग्वाही दिली. गौशाळेला वर्षभर दर महिन्याला चारा उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्र संचालन निखिल व सुवर्णा पारख यांनी तर आभार प्रदर्शन महावीर सिंघवी यांनी केले. कार्यक्रमास गावातील मान्यवर व जैन सोशल ग्रुप चे सदस्य उपस्थित होते.




