अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील जिल्हा परिषद मुलींच्या शाळेत महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून बोरगाव येथील सुभाष डोंगर शिंदे व त्यांचे सुपुत्र वाल्मीक सुभाष शिंदे, समाधान सुभाष शिंदे यांच्या दातृत्वातून सदर शालापयोगी साहित्य वाटप केले. विद्यार्थ्यांना स्टेशनरी (पॅड, वह्या, रंगपेटी, पेन्सिल, पट्टी ,रबर) इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करून ऋण व्यक्त करण्यात आले. तसेच यावेळी शिंदे यांनी आगामी शैक्षणिक वर्ष २०२४- २५ मधील शाळेत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस देणार असल्याचे जाहीर केले.