
सहाय्यक निवडणूक अधिकारी महादेव खेडकर यांची माहिती…
अमळनेर:- विधानसभा मतदार संघात लोकसभेच्या निवडणुकीसाठी दिव्यांग आणि ८५ वर्षे पेक्षा जास्त वय असलेल्या वृद्धांसाठी होम मतदान ४ मे रोजी होणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी महादेव खेडकर यांनी दिली.

अमळनेर विधानसभा मतदार संघात २९ दिव्यांग, १३० वयस्कर असे एकूण १५९ मतदारांसाठी होम मतदान घेण्यात येणार आहे. प्रत्येक मतदाराला बीएलओ मार्फत वेळ कळवण्यात आली आहे. प्रत्येक मतदाराच्या घरी मतदान केंद्र तयार करण्यात येईल. एकूण दहा पथके तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक पथकात मतदान केंद्र अधिकारी, निरीक्षक, शिपाई, कॅमेरामन असे सहा कर्मचारी असतील. बॉल पेनने मतपत्रिकेवर खुण करावी लागणार आहे. मतदार उपलब्ध न झाल्यास त्याला पुन्हा ९ तारखेला संधी देण्यात येणार आहे. पोस्टल बॅलेट देण्यात आलेल्या व ईडीसी देण्यात आलेल्या मतदारांच्या नावापुढे मतदार यादीत तशी नोंद करण्यात आली असल्याचे ही खेडकर यांनी सांगितले.




