अमळनेर:- प्रयत्नांमध्ये सातत्य असेल आणि ध्येय ठरलेला असेल तर परिस्थिती यशाच्या आड येत नाही अशीच गरिबीच्या परिस्थितीवर मात करून राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या राष्ट्रीय स्तरावरील आय.आय.टी एन. आय. टी.व्ही आय.आय.टी. प्रवेश परीक्षेत अमळनेर येथील व्ही.ए. काँटम इन्स्टिट्यूट (प्रताप पॅटर्न अमळनेर) येथील विद्यार्थिनी भूमिका प्रमोद पवारने घवघवीत यश संपादन केले.
या परीक्षेमार्फत राष्ट्रीय स्तरावरून लाखो विद्यार्थिनी आपले नशीब आजमावत असतात त्यासाठी विद्यार्थ्यांचे अभ्यासामध्ये सातत्य हवे असते ज्यांची आर्थिक परिस्थिती श्रीमंतीची असते ती विद्यार्थी पुणे, कोटा, लातूर, नांदेड, अकोला अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपले जेईईचा अभ्यास करत असतात मात्र या विद्यार्थिनीने घरी राहूनच व्ही.ए.काँटम इन्स्टिट्यूट येथे शिक्षण घेऊन जेईई परीक्षेत संपूर्ण भारतात मुलींमध्ये २१४ रँक मिळवून संपूर्ण खानदेशात नाशिक विभागात ९९.५८% मार्क्स मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.आयआयटी साठीच्या ऍडव्हान्स परीक्षेसाठी पात्र झाली असून आयआयटीत प्रवेश घेण्यासाठी ॲडव्हान्स परीक्षेतही यश संपादन करणार असल्याचे मत व्यक्त केले. भूमिकाच्या या यशाबद्दल परिसरातील शैक्षणिक क्षेत्रातून फार मोठे कौतुक होत असून अत्यंत गरिबीच्या परिस्थितीशी दोन हात करत मिळवलेले हे नेत्र दीपक यश इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे आहे. आर्थिक परिस्थितीशी सामना करीत अमळनेर मधील या तरुणीने जेईई परीक्षेत सखोल अभ्यास करून ९९.५८ टक्के गुण प्राप्त करून नाशिक विभागात अमळनेर नगरीचा झेंडा फडकविला आहे.इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण पी.बी.ए. इंग्लिश स्कूलमध्ये केले.यापुढील तिचे शिक्षण आय टी बॉम्बे सी एस ब्रांच येथे व्हावे अशी अपेक्षा तिने व्यक्त केली असून आपल्या यशाचे श्रेय आई नम्रता प्रमोद पवार, वडील प्रमोद विनायक पवार, शिक्षक आनंद पटेल व विक्रांत कुमार सर यांना दिले आहे.