
अमळनेर:- येथील खा.शि. मंडळाच्या कार्याध्यक्षपदी डॉ.संदेश बिपिन गुजराथी तर कार्योपाध्यक्ष पदी नीरज दिपचंद अग्रवाल यांची अधिकृत निवड संचालक मंडळाच्या सभेत काल दि 4 मे रोजी प्रताप महाविद्यालयात करण्यात आली.

मावळते कार्याध्यक्ष डॉ अनिल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत संचालक हरी भिका वाणी,योगेश मुंदडा,प्रदीप अग्रवाल तसेच डॉ संदेश गुजराथी व नीरज अग्रवाल उपस्थित होते तर विनोदभैय्या पाटील व कल्याण साहेबराव पाटील हे दोन संचालक अनुपस्थित होते.यावेळी कार्याध्यक्षपदासाठी डॉ गुजराथी यांच्या नावाची सूचना हरी भिका वाणी यांनी मांडली,तर कार्योपाध्यक्ष पदासाठी नीरज अग्रवाल यांच्या नावाची सूचना प्रदीप अग्रवाल यांनी मांडली अखेर सर्व संमतीने दोघांची निवड जाहीर करण्यात आली.निवड होताच महाविद्यालयाच्या आवारात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
त्यानंतर स्टाफ रूममध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ पार पडला,यावेळी मंचावर सर्व संचालक मंडळासह अध्यक्ष जितेंद्र झाबक,उपाध्यक्ष सौ माधुरी पाटील,जितेंद्र देशमुख, विश्वस्त सौ वसुंधरा लांडगे, प्राध्यापक प्रतिनिधी प्रा पराग पाटील,शिक्षक प्रतिनिधी विनोद कदम,मुख्याध्यापक प्रतिनिधी उपस्थित होते.यावेळी मावळते कार्याध्यक्ष डॉ अनिल शिंदे , विद्यमान कार्याध्यक्ष डॉ संदेश गुजराथी यांनी मनोगत व्यक्त करून आभार व्यक्त केले. सूत्रसंचालन प्राचार्य डॉ ए बी जैन यांनी केले.
याप्रसंगी सत्कारासाठी
माजी आमदार डॉ बी एस पाटील, मुंदडा फाऊंडेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश मुंदडा, अर्बन बँकेचे चेअरमन मोहन सातपुते,निवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील, प्रविण साहेबराव पाटील,लालचंद सैनांनी,जितेंद्र जैन,विजय पारेख, सुभाष अग्रवाल,प्रभाकर पाटील, राकेश माहेश्वरी, मुन्ना शर्मा,विवेक भांडारकर,सौ संध्या शाह,राजू फाफोरेकर,प्रविण जैन,साहेबराव शेजवळ,ऍड विवेक लाठी,विवेक संकलेचा,डॉ अविनाश जोशी,डॉ निखिल बहुगुणे,पंकज मुंदडा, पप्पू पहाडे,खंडू जैन,भरत कोठारी, विनोद अग्रवाल,प्रकाश मुंदडा, नरेंद्र निकुंभ,दशरथ लांडगे, कैलास सोनार,प्रसाद शर्मा, प्रा एम एस बडगुजर, राजू नंदा, मच्छीन्द्र लांडगे,अनिल रायसोनी,हिंदुजा,दिनेश नाईक, महेश पवार,गोटू गांधी,मुरली बितराई,शाह,प्राचार्य देवरे,जे पी पाटील, विक्रम शाह,रोहित सिंघवी, सुनिल वाघ,नाना शुल्क, राजेश शाह,हेमंत पवार,भोजमल पाटील,सुरेश तात्या,विनोद अमृतकर, दत्ता कासार,गोपी कासार उपस्थित होते.
दरम्यान तीन वर्षांसाठी निवडून आलेल्या विद्यमान संचालक मंडळाचा 2 वर्षांचा कार्यकाळ आता पूर्ण झाला असून अखेरच्या एक वर्षांसाठी दि 3 एप्रिल 2025 पर्यंत डॉ गुजराथी व नीरज अग्रवाल यांच्या खांद्यावर संस्थेची धुरा असणार आहे.त्यानंतर पुढील वर्षी संचालक मंडळास त्रैवार्षिक निवडणुकीस सामोरे जावे लागणार आहे.




