
जिल्हाधिकारी आयुषप्रसाद यांनी ही मतदानाच्या वेळी दिली भेट…
अमळनेर:- लोकसभेसाठी ८५ वर्षावरील वृद्ध व दिव्यांगांनी ४ रोजी १३१ जणांनी होम मतदान केले. २३ जणांचे मतदान बाकी राहिले आहे त्यांच्यासाठी पुन्हा ९ रोजी संधी देण्यात आली आहे. विधानसभा मतदार संघात लोकसभेसाठी दिव्यांग आणि ८५ वर्षे पेक्षा जास्त वय असलेल्या वृद्धांसाठी होम मतदान ४ मे रोजी घेण्यात आले.

अमळनेर विधानसभा मतदार संघात २९ दिव्यांग, १३० वयस्कर असे एकूण १५९ मतदार होते. प्रत्येक मतदाराला बीएलओ मार्फत वेळ कळवण्यात आली होती. प्रत्येक मतदाराच्या घरी मतदान केंद्र तयार करण्यात आले. एकूण दहा पथके होती. प्रत्येक पथकात मतदान केंद्र अधिकारी,निरीक्षक, शिपाई, कॅमेरामन असे सहा कर्मचारी होते. उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर व तहसीलदार रुपेशकुमार सुराणा स्वतः एक पथकात मतदारांच्या घरी जाऊन मतदान प्रक्रिया पूर्ण करून घेत होते. जिल्हाधिकारी आयुषप्रसाद यांनीही मतदानाच्या वेळी भेट दिली. २३ मतदारांपैकी काही मतदार बाहेरगावी गेलेले होते. पाच जण मयत झाले आहेत.




