
अमळनेर:- तालुक्यातील डांगर जानवे व चोपडाई कोंढावळ जंगलातील प्राण्यांसाठी असलेले कृत्रिम पाणवठे कोरडे पडल्याने जनावरांचे पाणी पिण्यासाठी हाल होत आहेत.

यावर्षी टंचाईची तीव्रता जाणवत असून तापमानाचा पारा ४३ पर्यंत गेल्याने कडक उन्हात माणसांसह जंगलातील प्राण्यांचेही हाल होत आहेत. पाण्यासाठी जनावरे वणवण भटकत आहेत. वनविभागाने कृत्रिम पाणवठ्यात टँकरने पाणी टाकले होते. मात्र ते पाणी अपेक्षेपेक्षा आधी संपल्याने पाण्याच्या शोधार्थ जनावरे सैरावैरा धावत आहेत. वनविभागाने पाणवठ्यात पाणी टाकण्याची सोय करावी, अशी मागणी डांगरचे राजेश वाघ यांनी केली आहे.
प्रतिक्रिया…
तालुक्यातील सर्वच कृत्रिम पाणवठ्यात पाणी टाकण्याचे काम अविरत सुरू असून उन्हाळ्यात प्राण्यांचे पाण्यावाचून हाल होवू नयेत यासाठी उपाययोजना करणे सुरू आहे.
:- पी जे सोनवणे, वन विभाग




