
एकलहरे येथील एकाविरुद्घ मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद…
अमळनेर:- तालुक्यातील एकलहरे येथे एकाने महिलेला फोनवरून अश्लील शिवीगाळ करत हातपाय तोडण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, एकलहरे येथील ४५ वर्षीय महिलेस गावातील ललित पुंजू पाटील याने फोन करून सांगितले की, “सकाळी तू ज्या महिलेसोबत बोलत होती, तिच्या सोबत बोलू नको माझे आणि तिचे प्रेमसंबंध आहेत.” यावर फिर्यादी महिलेने कोणत्या बाईसोबत बोलू नको अशी विचारणा केली असता ललित याने अश्लील शिवीगाळ करत हातपाय तोडण्याची धमकी दिली. सदर महिलेच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ सचिन निकम हे करीत आहेत.




