
अग्निशमन विभागाने आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला…
अमळनेर :- येथील अमळनेर रेल्वे स्थानकावरील काटेरी झुडुपांना अचानक आग लागल्याची घटना घडली होती.मात्र अग्निशमन विभागाने तात्काळ आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला आहे.

अमळनेर रेल्वे स्थानकाजवळ असणाऱ्या काटेरी झुडुपांना दि.४ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. मात्र पालिकेचे अग्निशमन विभागाचे प्रमुख दिनेश बिऱ्हाडे,चालक फारूक शेख,जाफर पठाण, सत्येन संदानशीव व फायरमन आनंदा झिंबल यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली. आग रेल्वे रुळाच्या जवळच लागलेली असल्याने त्या ठिकानाहून रेल्वेच्या महत्वाच्या वायर गेलेल्या होत्या. आग आटोक्यात आली नसती तर ह्या वायरी जळाल्या असत्या व रेल्वेचे मोठे नुकसान झाले असते म्हणून रेल्वे स्टेशन मास्तर यांनी पालिकेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर व अग्निशमन दलाचे आभार मानले.




