
मुख्याधिकारी नेरकर यांनी दिले गार्डन ग्रुप सदस्यांना मतदानाचे निमंत्रण
अमळनेर-लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासन जनजागृती करीत असुन सदर जनजागृती मोहिमेत अमळनेर नगरपरिषद देखील सहभागी झाली असून मुख्याधिकारी तुषार नेरकर ठिकठिकाणी जाऊन जनजागृती करीत आहेत.

या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाने मतदान मोहिमेसाठी “एकी”(Eci) टेडीबीअर ची निर्मिती केली असून हा एकी विवाह सोहळे तथा विविध ठिकाणी जाऊन सर्वानी मतदान करावे यासाठी जनजागृती व मतदानासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे निमंत्रण देत आहे.सदर मोहिमेंतर्गत हा एकी दि 8 रोजी सकाळी 8 वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात पोहोचला होता,यावेळी मुख्याधिकरी तुषार नेरकर,उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड देखील उपस्थित होते.यावेळी नेरकर यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डन मॉर्निंग ग्रुपचे सदस्य व मॉर्निंग वॉक साठी येणाऱ्यांना जास्तीतजास्त संख्येने मतदान करावे असे आवाहन करून जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले मतदानाचे निमंत्रण देखील दिले.तसेच कोणत्याही ग्रुपने 100 टक्के किंवा जास्त टक्केवारीत मतदान केल्यास त्यांना त्यांच्या सन्मानासाठी विविध योजनांची माहिती देखील त्यांनी दिली.व कोणत्याही परिस्थितीत लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी व्हा असे आवाहन त्यांनी शेवटी केले.यावेळी नितीनकुमार शाह यांनी मिमिक्री तर सौ उज्वला शिरोडे यांनी काव्यातून मतदानाची जनजागृती केली. अनेकांनी “एकी” सोबत सेल्फी काढण्याचा आनंद घेतला. सूत्रसंचालन न. पा.चे सोमचंद संदानशिव यांनी केले.
यावेळी ग्रुप एडमीन संजय चौधरी व चेतन राजपूत तसेच जेष्ठ सदस्य बजरंगलाल अग्रवाल, प्रकाशचंद पारेख,डॉ संजय शाह,वीरेंद्र वाधवाणी,शिवाजी दौलत पाटील,प्रा बहुगुणे, युवराज पाटील,नरेंद्र दोढीवाला,संतोष पाटील, प्रेमकुमार शाह,जयदीप राजपूत,प्रविण पारेख,निखिल पारेख, विजय चौधरी, कैलास केदार,निलेश देवपूरकर, राजू चौधरी, चेतन सोनवणे,प्रकाश सोनार,गोकुळ पाटील,महेश राजपूत तसेच सौ सीमा शाह आणि न पा चे आरोग्य निरीक्षक संतोष बिऱ्हाडे व कर्मचारी उपस्थित होते.




