
सहा महिन्यापासून पथदिवे बंद असल्याचा रहिवाश्यांचा आरोप…
अमळनेर:- शहरातील न्यू प्लॉट भागातील शीतल बिल्डिंगजवळ मोठ्या प्रमाणावर कचरा साचला असून पथदिवे बंद असल्याने नगरपरिषदेकडून ह्या भागात दुर्लक्ष होत असल्याचा आरोप रहिवाश्यांनी केला आहे.

नवरात्रीपासून ह्या भागातील पथदिवे बंद असून रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरते. तसेच परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा साचल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे येथील रहिवासी किरण जैन यांनी सांगितले. इतर भागात नियमित साफसफाई होते मात्र ह्या भागात दुर्लक्ष होत असून नगरपरिषदेने त्वरित उपाययोजना करून पावसाळ्याआधी समस्या दूर कराव्यात अशी मागणी रहिवाश्यांनी केली असून अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.




