
अमळनेर:- तालुक्यातील धार येथे कै.बहिणाबाई सार्वजनिक वाचनालयातर्फे मोफत नेत्रतपासणी शिबिर उत्साहात संपन्न झाले.

०८ मे रोजी धार येथे दिवंगत हिम्मत शिवदास पाटील (एच. एस. पाटील) व दिवंगत शिवदास ओंकार पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने, कै. बहिणाबाई समाज प्रबोधन सार्वजनिक ग्रंथालय यांच्याकडून मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे आयोजन वाचनालयाचे अध्यक्ष, तसेच विकासो चेअरमन मयूर हिम्मतराव पाटील व सामाजिक कार्यकर्ते प्रमोद हिम्मतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
शिबिरासाठी धार, मालपुरसह परिसरातील ग्रामस्थांनी सहभाग दर्शविला. शिबिरासाठी तज्ञ डॉ. प्रकाश कोळी यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे माजी अध्यक्ष कै. एच एस पाटील आणि कै. शिवदास ओंकार पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, फित कापून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी रामकृष्ण पाटील, उमाकांत साळुंखे, कैलास पाटील, गणेश पाटील, यशवंत पाटील, अलीम मुजावर, यशवंत बागुल, मिलिंद पाटील, अरुण पाटील, सुभाष पाटील, व्ही एन मुजावर यांच्यासह मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर पाटील यांनी करत कार्यक्रमाला हजेरी लावल्याबद्दल व उपक्रमाचा लाभ घेतल्याबद्दल ग्रामस्थ व मान्यवरांचे आभार मानले.

