
मोटरसायकल चालकाविरुद्ध अमळनेर पोलीसात गुन्हा दाखल…
अमळनेर:- रस्तावर बंद पडलेल्या चारचाकी वाहनाचा डिझेल नॉब तपासण्यासाठी उतरलेल्या चालकाला मोटरसायकलने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना धुळे रस्त्यावर घडली असून मोटरसायकल चालकाविरुद्ध अमळनेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर हुन धुळ्याकडे जाणारी महिंद्रा स्कार्पिओ क्र. एम एच १८ एजे ९११९ ही मंगरूळ ते लोंढवे फाट्यादरम्यान रात्री १२ वाजेच्या सुमारास बंद पडली. चालक सुनिल निगडे याने वाहनांचे चारही इंडिगेटर चालू करून डिझेल नॉब तपासण्यासाठी खाली उतरला. त्याच वेळेस अमळनेर कडून धुळ्याकडे भरधाव वेगात जाणारी मोटरसायकल क्र.एम एच १९ सी सी ०६७१ ने त्यास जोरदार धडक दिल्याने तो डाव्या बाजूच्या खड्यात फेकला गेला.त्याच्या पायाला दुखापत झाल्याने त्यास दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले तर मोटरसायकल चालकाला ही गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
ज्ञानेश्वर नंदलाल माळे रा. मोहाडी उपनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोटरसायकल चालक मनीष चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलाश शिंदे करीत आहेत.




