
अमळनेर:- येत्या सोमवारी १३ मे रोजी भरणारे आठवडे बाजार इतर दिवशी भरवण्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आदेश दिले आहेत. किरकोळ विक्रेते,भाजीपाला विक्रेते, मजूर, कामगार याना मतदान करता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

१३ मे रोजी अमळनेर तालुक्यातील अमळनेर, पातोंडा जळगाव तालुक्यातील करंज, जामनेर तालुक्यातील फत्तेपुर, गारखेडा बुद्रुक,पाळधी, यावल तालुक्यातील न्हावी, सावखेडा सिम , सांगवी बुद्रुक , भडगाव तालुक्यातील वाडे , पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा , सामनेर , सातगाव , डोंगरी , बदरखे ,चोपडा तालुक्यातील अडावद , कमळगाव , वर्डी , रावेर तालुक्यातील दसनुर ,विटवे , बलवाडी ,लोहारे , उदळी खुर्द ,विवरे बुद्रुक , खानापूर , पारोळा तालुक्यातील तामसवाडी, धरणगाव तालुक्यातील सतखेडा, वराड बुद्रुक, साळवा , मुक्ताईनगर तालुक्यातील कर्की , हरताळे , नायगाव, चाळीसगाव तालुक्यातील लोंजे ,दहिवद , एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव , भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे प्र न या गावाचे आठवडे बाजार आहेत. मात्र बाजारच्या दिवशी नागरिक व्यवहारात, खरेदी, विक्रीत व्यस्त असले तर मतदानाला कंटाळा करतील किंवा व्यस्त असल्याने जमणार नाही. म्हणून प्रशासनाने निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जास्तीत जास्त मतदान व्हावे म्हणून मतदानाच्या दिवशी भरणारे आठवडे बाजार इतर दिवशी भरण्याचे आदेश दिले आहेत.




