अमळनेर:- होम मतदानाला गैरहजर असलेल्या २३ पैकी ३ मतदारांनी ९ रोजी होम मतदान केले असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी दिली.
अमळनेर तालुक्यात २९ दिव्यांग आणि १३० मतदार ८५ पेक्षा अधिक वयाचे होते. ४ रोजी १३१ जणांनी मतदान केले होते. ४ रोजी एका वृद्ध व्यक्तीने पैशाशिवाय मतदान करणार नाही असा आग्रह धरला होता. मतदान अधिकाऱ्यांनी त्याला खूप समजावून सांगितले होते तरी देखील त्याने मतदान करण्यास नकार दिला होता. अधिकाऱ्यांनी तसा पंचनामा करून त्याला पुन्हा ९ रोजी मतदान करण्याची संधी मिळेल आम्ही पुन्हा येऊ असे सांगितले होते. मात्र हा वृद्ध आज घरी नसल्याचे सांगण्यात आले. बराच वेळ प्रतीक्षा करूनही वृद्ध आला नाही म्हणून मतदान अधिकाऱ्यांना माघारी फिरावे लागले. २३ जणांपैकी एक दिव्यांग आणि दोन वयोवृद्ध अशा फक्त तीन जणांनी ९ रोजी मतदान केले. तर अमळनेर तालुक्यातील कारागृहात असलेला तन्वीर शेख याच्या मतदानासाठी एक पोलीस दोन अधिकारी ठाणे कारागृहात गेले आहेत.