प्रचार संपताच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने कारवाई…
अमळनेर:- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशाने निवडणुकीचा प्रचार संपताच तालुक्यातील ४४ दारू दुकानांना राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे सील लावण्यात आले आहे.
निवडणूक कालावधीत आचार संहितेचे पालन व्हावे, बळाचा वापर, पैसे, दारूचे आमिष दाखवण्यात येऊ नये म्हणून मद्य विक्री पूर्णपणे बंद असावी असे निवडणूक आयोगाने निर्देश दिल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने ११ रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास देशी दारू दुकाने, वाइन शॉप,बियर बार, ताडी विक्री अशी ४४ दुकाने सील लावून बंद करण्यात आली आहेत. १३ रोजी सायंकाळी सात वाजेपर्यंत सील लावलेले असेल असे निरीक्षक देवदत्त पाचपोळ यांनी सांगितले.
निवडणूक काळात अनेक दुकानदार बंदी असतानाही चोरून लपून दारू विकतात. म्हणून यंदा फक्त बंदीचे आदेश देण्यापेक्षा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे डी एस पाचपोळे, राहुल सोनवणे, विजय परदेशी यांनी दुकानांना सील लावण्यात आले आहेत. ११ रोजी सायंकाळी प्रचार बंद झाला तशी दारू देखील बंद करण्यात आली आहे.